संगमनेर तालुक्यात ग्रामीण भागात २४ तर शहरात ३ रुग्णांची भर
संगमनेर: संगमनेर तालुक्यात बुधवारी 27 जण करोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामध्ये शहरातील तीन तर ग्रामीण भागांत 24 जण बाधित आढळले आहे. तालुक्याची एकूण करोना बाधितांची संख्या 4 हजार 184 वर पोहोचली आहे.
आज प्राप्त झालेल्या अहवालात शहरातील गणेश नगर येथे 63 वर्षीय पुरुष, कोल्हेवाडी रोड 55 वर्षीय महिला, घुलेवाडी येथील साईश्रद्धा चौक 63 वर्षीय पुरुष बाधित आढळून आले आहे.
तर ग्रामीण भागात समनापुर येथे 61 वर्षीय पुरुष, जोर्वे येथे 85 वर्षीय पुरुष, 36 वर्षीय पुरुष, हंगेवाडी येथे 70 वर्षीय महिला, 19 वर्षीय तरुण, घुलेवाडी येथे 39, 36, 35 वर्षीय पुरुष, पिंपरने येथे 39 वर्षीय पुरुष, वाघापूर येथे 44 वर्षीय पुरुष, चिकणी येथे 28 वर्षीय पुरुष, सोनोशी येथे 27 वर्षीय पुरुष करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
शेडगाव येथील 38 वर्षीय पुरुष, झोळे येथे 24 वर्षीय पुरुष, 24 वर्षीय महिला, चंदनापुरी येथे 67 वर्षीय पुरुष, खांडगाव येथे 33,7 वर्षीय पुरुष, ओझर खुर्द येथे 37 वर्षीय पुरुष, आश्वी बुद्रुक येथे 43, 25, 23, 22 वर्षीय पुरुष, 18 वर्षीय तरुणी असे पाच जण बाधित आढळून आले आहेत.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Ahmednagar News, and Latest Marathi News Live
Web Title: Sangamner rural area 24 and city 3 corona infected