वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस, झाडे उन्मळून पडली, दुकानांचे पत्रे उडाले, नागरिकांची उडाली धांदल
Breaking News | Ahilyanagar Stormy rain : वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली.
संगमनेर | राहता: आज दुपारच्या सुमारास संगमनेर व राहाता तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने मोठे नुकसान झाले आहे.. वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत
अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलं आहे. दरम्यान, पूर्वमोसमी पावसाचीही हजेरी लागली.
साकुरी गावात अनेक वर्षे जुने वडाचे झाड ग्रामदैवत विरभद्र महाराजांच्या मंदिरावर पडल्याची घटना घडली आहे..
वादळी वाऱ्याचा जोर इतका होता की रस्त्याच्या कडेला असलेली झाडेही जागच्या जागी उन्मळून पडली. अनेक दुकानांचे पत्रे उडून शेजारच्या इमारतींवर गेले.
या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी वाऱ्याच्या तडाख्यामुळे झालेल्या नुकसानीमुळे चिंता वाढली आहे.
महत्वाचे: नवनवीन फिचर मिळविण्यासाठी आजच आपला अॅप अपडेट करा. येथे क्लिक करा.
संगमनेर तालुक्यात साकुर भागात घरांची छते उडाली आहे. शेतात पाणीच पाणी साचले आहे.
आज निमगाव भोजपूर, निमज, चंदनापुरी, वेल्हाळे, सांगवी, पेमगिरी नांदुरी, राजापूर, चिकणी, या परिसरामध्ये जोरदार पाऊस झाला. या भागामध्ये डाळिंब पीक मोठ्या प्रमाणात असून या अवकाळी पावसाने डाळिंब पिकाचे मोठे नुकसान झाले याचबरोबर शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या कांदा हा शेतीमध्ये डेपो बनवून साठवला होता. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांनी साठवलेले कांद्याचे डेपो पूर्णपणे वाया गेले आहे.
याचबरोबर कोबी, फ्लॉवर यांच्या लागवडी मोठ्या प्रमाणात झाले असून, वालवड सह भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे .तर काही गावांमध्ये घरांची पडजड झाली आहे. काही ठिकाणी जनावरे दगावली आहे.
तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीची माहिती मिळताच थोरात यांनी सर्व कार्यकर्त्यांना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीच्या तातडीच्या सूचना दिल्या असून प्रशासनाने त्वरित सर्व नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून सर्वांचे त्वरित पंचनामे करावे. याचबरोबर शासनाकडून लवकरात लवकर जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी काम करावे यासाठी सूचना केल्या आहेत.
वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच धांदल उडवल्याचे बघायला मिळाले…
Breaking News: Sangamner Rahata Stormy rain with stormy wind, trees were uprooted