संगमनेर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक लाच स्वीकारताना पकडले रंगेहाथ
संगमनेर: संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक बी. बी. देशमुख याला पोलीस ठाण्यातच १ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शनिवारी सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास रंगेहाथ पकडले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.
याबाबत अधिक माहिती अशी की, एका व्यक्तीने शहर पोलीस ठाण्यात काही दिवसांपूर्वी पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाचा तपास पोलीस नाईक बी.बी. देशमुख याच्याकडे सोपविण्यात आला होता. तक्रार देणाऱ्या व्यक्तीची पत्नी ही मिळून आल्याने पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार बंद केल्याने त्या व्यक्तीकडे एक हजार रुपयांची मागणी केली होती. त्यांनतर या व्यक्तीने नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केल्याने तक्रारदार व्यक्तीकडून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात एक हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. पोलीस निरीक्षक उज्ज्वलकुमार पाटील व पोलीस निरीक्षक प्रशांत सपकाळ यांनी लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.
Web Title: Sangamner police station caught red-handed while accepting a bribe