संगमनेर: एकतर्फी प्रेमातून तरुणीने तरुणाच्या त्रासाला कंटाळून केली आत्महत्या
संगमनेर | Sangamner: एकतर्फी प्रेमातून अनेक घटना घडत असतात. त्यातच संगमनेर तालुक्यात एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने तरुणीला त्रास दिल्याने असह्य झालेल्या तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
संगमनेर शहरातील २८ वर्षीय तरुणीस वारंवार भेटण्यास बोलावून तिला त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी घारगाव येथील संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शहरातील पावाबाकी रोड येथील एका तरुणीस आरोपी सुनील भानुदास फाकटकर याने वारंवार भेटण्याचा फोन वरून आग्रह धरला. त्याचबरोबर तिला वारंवार त्रास देत तिचे जगणे असह्य केले. अखेर या पिडीत तरुणीने १८ ऑक्टोबर ते १९ ऑक्टोबर दरम्यान आत्महत्या करून तिने आपले जीवन संपविले.
याप्रकरणी पोपट अप्पासाहेब गाडेकर रा. राहता यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून सुनील फाकटकर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अभय पारमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक परदेशी हे करीत आहे.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, Ahmednagar News, and Latest Marathi News Live
Web Title: Sangamner one-sided love the young woman committed suicide