एक भामटा संगमनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांचे बनावट फेसबुक खाते बनवून करतोय पैशाची मागणी
संगमनेर: सोशियल मेडीयाच्या माध्यामातून एक भामटा बनावट खाते बनवून त्यामधून मित्रमंडळी व ओळखीच्या नातेवाईक यांना संदेश पाठवत पैसे लुटण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
संगमनेर समितीचे गटविकास अधिकारी सुरेश शिंदे यांचे फेसबुकचे बनावट खाते तयार करून त्याद्वारे अनेकांकडे पैशाची मागणी करण्यात आली आहे. याप्रकरणी अधिकारी सुरेश शिंदे यांनी सायबर पोलिसांत तक्रार केली आहे.
गट विकास अधिकारी सुरेश शिंदे यांचे पूर्वीपासून फेसबुक खाते आहे. कोणत्यातरी भामट्याने या खात्यातील फोटो कॉपी करून हे फोटो व नावाचा गैरवापर करत सुरेश शिंदे या नावाने नवीन खाते सुरु केले. अधिकारी शिंदे यांच्या पूर्वीच्या अधिकृत खात्याला जोडलेले त्यांचे मित्रमंडळी व नातेवाईक यांना फ्रेंड रिकवेस्ट पाठविली. सुरेश शिंदे यांचे हे अधिकृत खाते असल्याचे त्याने दाखविले. अडचणीत असल्याचे कारण देत त्याने बऱ्याच जणांना संदेश पाठवत पैशाची मागणी केली.
याबाबत काहीना शंका आल्याने त्याने प्रत्यक्ष अधिकारी सुरेश शिंदे यांना भेटून व मोबाईलवर संपर्क केला. माझे फेसबुकचे एकच खाते असून दुसरे खाते नाही असे सांगितले.
माझे सुरेश शिंदे या नावाने बनावट खाते बनविण्यात आले असून पैशाची मागणी होत आहे. कृपया कोणीही या मेसेजला उत्तर देऊ नये अशी पोस्ट शिंदे यांनी आपल्या अधिकृत खात्यावरून प्रसारित केली आहे.
Web Title: Sangamner officer Suresh Shinde Duplicate Facebook Account