Home संगमनेर संगमनेर: विवाहितेचा छळ नऊ जणांवर गुन्हा दाखल

संगमनेर: विवाहितेचा छळ नऊ जणांवर गुन्हा दाखल

संगमनेर: विवाहितेचा छळ  नऊ जणांवर गुन्हा दाखल

संगमनेर: नांदूर खंडाळा ता. श्रीरामपूर येथे सासरी नांदत असताना गाडी घेण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये घेऊन ये, तुला स्वयंपाक येत नाही या कारणावरून तालुक्यातील जोर्वे माहेर असलेल्या विवाहितेचा छळ करणार्या पतीसह सासरच्या नऊ जणांवर तालुका पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

याबाबत माहिती अशी कि, स्वाती मयूर अभंग हिने तालुका पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली असून याय तिने म्हटलंय कि, नांदूर खंडाळा ता. श्रीरामपूर येथील मयूर भास्कर अभंग या तरुणाशी लग्न झाले आहे. लग्नानंतर काही दिवस सासरच्या मंडळीने चांगले नांदविले मात्र त्यानंतर काही दिवसातच नवरा मयूर भास्कर अभंग, सासरा भास्कर तुळशीराम अभंग, सासू मीना भास्कर अभंग, आजी सासू सखुबाई तुळसीराम अभंग, आजे सासरा तुळशीराम मारुती अभंग, नणंद पूनम भास्कर अभंग, माधुरी उदमले, मनीषा सुरसे यांनी स्वयंपाक येत नाही, तू काळी आहे, आम्हाला तवेरा गाडी घेण्यासाठी ५ लाख रुपये माहेरून घेऊन ये असे म्हणत वेळोवेळी शारीरिक व मानसिक त्रास दिला. अनेक वेळा उपाशी ठेऊन मारहाण केली.

अशी फिर्याद दिली यावरून तालुका पोलीस ठाण्यात ९ जणांवर गुन्हा दाखल केला.

Fashion Ad


आमच्या संगमनेर अकोले न्यूजच्या व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. संगमनेर अकोले न्यूज–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here