Home संगमनेर संगमनेरात नियमांचे उल्लंघन मंगलकार्यालय, हॉटेल, स्वीट्स दुकान सील

संगमनेरात नियमांचे उल्लंघन मंगलकार्यालय, हॉटेल, स्वीट्स दुकान सील

Sangamner News Violation of rules in Sangamnera Mangalkaryalaya

संगमनेर | Sangamner News: संगमनेर तालुक्यात कोरोना रुग्णांत वाढ होत असल्याने प्रशासनाने पुन्हा एकदा कारवाईचा बडगा उगारला आहे. शासनाने जारी केलेल्या नियमांचा भंग भंग केल्याने संगमनेर शहरातील एका हॉटेलसह तीन दुकाने सील करण्यात आली आहे. तसेच तालुक्यातील निंबाळे येथील मंगलकार्यालय सील करण्यात आले आहे.

कोरोनाचे पालन होत नसलेल्या ठिकाणी कठोर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले आहे. काल सायंकाळी सात वाजेच्या सुमारास एक स्वीट्स दुकान व तीन बत्ती येथील लजीज हॉटेल या दुकानांत ग्राहकांची गर्दी आढळून आली. त्यामुळे नायब तहसीलदार यांच्या पथकाने दुकानांवर कारवाई करत सील केले आहे.

तसेच नियमांचे पालन न केल्यामुळे तालुक्यातील निंबाळे शिवारातील जे.डी. लोन्स सील करण्यात आले आहे. कोरोना पार्श्वभूमीवर मंगलकार्यालय लोन्स पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले होते. मात्र या आदेशाचे पालन न करता जे.डी. लोन्स येथे धूमधडाक्यात विवाह सोहळा सुरु होता. याची माहिती मिळताच नायब तहसीलदार उमाकांत कडनोर, पोलीस उपनिरीक्षक शिंदे यांनी हे लोन्स सील केले आहे. यापुढेही अशा कारवाया सुरूच राहतील असे नायब तहसीलदार उमाकांत कडनोर यांनी सांगितले. 

Web Title: Sangamner News Violation of rules in Sangamnera Mangalkaryalaya

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here