संगमनेर: पाच गायींचा अचानक मृत्यू
साकुर: संगमनेर तालुक्यातील साकुर परिसरातील कोठेमलकापूरजवळील गुळवे वस्तीत राहणारे योगेश हरिभाऊ गीते यांची १ तर सर्जेराव आबाजी गुळवे यांच्या चार गायी गुरुवारी रात्री अचानक दगावल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या गायींचा मृत्यू कशामुळे झाला याची निश्चित माहिती अजून समजू शकली नाही.
You May Also Like:Shahid Kapoor wife age | Mira Rajput
सविस्तर माहिती अशी कि गुरुवारी रात्रीच्या सुमारास कौठेमलकापूर येथील दोन शेतकर्यांच्या ५ गायी अचानक दगावल्या. योगेश गीते सकाळी नेहमीप्रमाणे उठल्यानंतर गोठ्यात गेले असता हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर गीते व गुळवे यांनी याबाबत पशु वैद्यकीय अधिकार्यांना याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वैद्यकीय डॉक्टर नितीन जोंधळे तलाठी गणेश शिंदे दाखल झाले. पशु वैद्यकीय डॉक्टरांनी या गायींची तपासणी केली मात्र त्यांच्या मृत्यू बाबत पुढील अहवाल आल्यावरच माहिती समजेल असे सांगितले.
दरम्यान या घटनेमुळे या दोन्ही शेतकर्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून या गायींवर कोणी विष प्रयोग केला कि काय या बाबत उधाण आले आहे. या घटनेमुळे चिंतेचे वातावरण पसरले आहे.
आमच्या संगमनेर अकोले न्यूजच्या व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. संगमनेर अकोले न्यूज–येथे क्लिक करा.
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.