Fire: संगमनेर: मिल्किंग कंपनीला आग लागून दीड कोटींचे नुकसान
Sangamner | संगमनेर: संगमनेर शहराजवळच्या औद्यागिक वसाहतीमधील एचपी मिल्किंग या कंपनीला शोर्टसर्किटमुळे आग (Fire) लागून कंपनीतील कच्चा मालासह यंत्रसामुग्री जळाल्याने सुमारे एक कोटी ४० लाखांचे नुकसान झाल्याची घटना मंगळवारी सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, ज्ञानेश्वर भास्कर वाके रा. शारदा कॉलनी संगमनेर कॉलेजसमोर यांची औद्यागिक वसाहतीत एचपी मिल्किंग या नावाची कंपनी आहे. सोमवारी दिवसभर कंपनी चालू होती. रात्री आठ वाजता मशिनरी बंद करून कामगार गेल्यानंतर वाके घरी गेले. आज सकाळी साडे आठ वाजता श्री मेटल कंपनीचे मालक शेखर आसने यांनी वाके यांना फोन करून कळविले की, तुमच्या कंपनीतून धूर येत आहे. ते घटनास्थळी पोहोचेपर्यंत अग्निशमन दलाच्या बंबानी पाणी मारून आग विझविली होती. शोर्टसर्किटमुळे कच्चा माल व सर्व यंत्रसामुग्री जळून गेली होती.
यामध्ये आगीत १ कोटी ४० लाख रुपयांचे यंत्रसामुग्री व कच्चा मालाचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी ज्ञानेश्वर वाके यांनी दिलेल्या खबरीवरून शहर पोलिसांनी जळीताची नोंद केली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.
Web Title: Sangamner Milk company loses Rs 1.5 crore due to fire