संगमनेर: कोल्हेवाडीच्या युवकाचा मृतदेह कासारवाडीच्या विहिरीत
संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी येथील फोटोग्राफर प्रदीप पोपट कोल्हे वय ३५ या युवकाचा मृतदेह सोमवारी रात्री कासारवाडी शिवारातील एका विहिरीत आढळून आल्याची घटना समोर आली आहे.
प्रदीप हा सहा दिवसांपासून बेपत्ता होता. दवाखान्यात जातो असे सांगून तो घरातून गेला होता. कुटुंबातील नातवाईक यांनी शोध घेतला मात्र मिळून आला नाही. त्याची पत्नी सविताने शुक्रवारी तालुका पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती.
त्यानंतर त्याचा सोमवारी मृतदेह आढळून आला. बाबसाहेब पांडे रा. घुलेवाडी यांच्या खबरीवरून शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. प्रदीपने आत्महत्या (suicide) का केली यामागचे कारण अद्याप समजू शकले नाही. प्रदीपच्या मागे आई वडील पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.
Web Title: Sangamner kolhevadi youth suicide