ATM Theft: संगमनेर तालुक्यात एटीएम मशिन फोडल्याने खळबळ
Sangamner | Atm Theft | संगमनेर: संगमनेर तालुक्यातील घारगाव येथील भारतीय स्टेट बॅंकेचे एटीएम मशिन चोरट्यांनी फोडल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. संगमनेर तालुक्यातील पठार भागात सातत्याने होणाऱ्या चोऱ्यांच सत्र सुरूच आहे. यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास सिसिटिव्ही कॅमेर्यावर काळया कलरचा पेंट मारत एटीएम मशिनचा दरवाजा गॅस कटरच्या साहाय्याने कापून मशीनची उचकापाचक करण्यात आली.
सदर घटनेची माहिती समजताच पोलिस निरीक्षक सुनील पाटील, राजेंद्र लांडे, संतोष फड यांच्यासह घारगांव स्टेट बँक शाखेचे शाखाधिकारी कांचन दाभणे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आहे. चोरट्यांनी नेमकी किती रक्कम चोरून नेली याबाबत अद्याप माहिती समजली नाही.
Web Title: Sangamner Ghargaon SBI ATM Theft