संगमनेर दूधगंगा अपहार, आरोपी कुटेला सिव्हिलमध्ये हलविले, नेमकं काय आहे कारण?
Breaking News | Sangamner: भाऊसाहेब कुटे याला संगमनेरच्या दुय्यम कारागृहातून ग्रामीण रुग्णालयात व तेथून आता अहमदनगरच्या सिव्हिल रुग्णालयात हलविण्यात आले.
संगमनेर: दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या आर्थिक ८१ कोटीच्या घोटाळा प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या भाऊसाहेब कुटे याला संगमनेरच्या दुय्यम कारागृहातून ग्रामीण रुग्णालयात व तेथून आता अहमदनगरच्या सिव्हिल रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
संगमनेरमधील दुधगंगा नागरी पतसंस्थेचे सुमारे ८१ कोटी रुपयांचे आर्थिक गैरव्यवहार प्रकरण यातील आरोपी कुटे पोलिसात हजर झाला. कुटे याला न्यायालयीन कोठडीच्या कालावधीत संगमनेरच्या दुय्यम कारागृहात ठेवण्यात आले. मात्र चार दिवसांपूर्वी संगमनेर येथे ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी त्यास दाखल करण्यात आले. त्यानंतर संगमनेर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या
अहवालानुसार कुटे यास नगरच्या सिव्हिल रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविले आहे. संगमनेरच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी १८ तारखेला अहवाल दिल्यानंतर कारागृह अधीक्षक तथा तहसीलदारांनी देखील लगेच याच दिवशी आदेश काढून कार्यवाही केली आहे. केवळ पोलिसांच्या पत्रावरून उपचारासाठी हलविल्याचा हवाला देण्यात आला असला तरी आरोपीला नेमका कोणता आजार झाला याबाबत माहिती नसल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, कुटे याला उपचारासाठी नगरला हलविण्यात आले, मात्र नेमके कारण गुलदस्त्यात असून यात ग्रामीण रुग्णालयाचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, पोलिस निरीक्षक भगवान मथुरे, तहसिलदार धीरज मांढरे हे माहिती देण्यावर मौन बाळगून आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
Web Title: Sangamner Dudhganga embezzlement, accused Kutela moved to civil
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study