Home क्राईम संगमनेरात नात्याला काळिमा फासणारी घटना: दिराचा भावजयीवर अत्याचार

संगमनेरात नात्याला काळिमा फासणारी घटना: दिराचा भावजयीवर अत्याचार

Ahmednagar | Sangamner News:  एका २२ वर्षीय भावजयीला  अश्लील व्हिडीओ दाखवुन व जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्याच दिराने वारंवार अत्याचार(abused) केल्याची घटना.

Sangamner Dira's abused of her brother-in-law

संगमनरे: संगमनेर शहरात नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका २२ वर्षीय भावजयीला  अश्लील व्हिडीओ दाखवुन व जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्याच दिराने वारंवार अत्याचार केल्याची घटना दि. २४ जानेवारी २०२२ ते १५ मे २०२२ शहरातील चैतन्य नगर या प्रतिष्ठीत उपनगरात घडली. या प्रकरणी पिडीतेचा नवरा, सासु, सासरा, दिर अशा चार जणांवर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपी फरार झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पिडीत महिलेचे पहिलं लग्न झाले होते. मात्र, काही अंतर्गत कलहामुळे आपल्या पतीला पिडीत महिलेने सोडुन दिले होते. ती केस न्यायालयात चालु असताना तीचे संगमनेर शहरातील चैतन्य नगर येथे दि. ३१ जुलै २०२० रोजी दुसरे लग्न झाले. पती व सासु एका खाजगी कंपनीच्या प्रोडक्टचे मार्केटिंग करायचे तर दिर या कंपनीचे वस्तु विकायचा. सासरा अपंग असल्याने घरीच असायचा. त्यांचा संसार एक वर्षे अगदी सुरळीत चालल्या नंतर पिडीत महिलेला एक मुलगा देखील झाला. काही दिवसांनी पिडीत महिलेचा पती व सासु कामानिमित्त औरंगाबाद व पुणे येथे बाहेर जात आहोत असे सांगुन निघुन जायचे व पंधरा-पंधरा दिवस घरी येत नसत.

दरम्यान, दि. ५ जानेवारी २०२२ रोजी पिडीत महिलेचा वाढदिवस होता. पिडीत महिलेच्या दिराने न मागता ऑनलाइन तीला साडी गिफ्ट दिली व तुम्ही मला आवडता असे म्हणत व्हाट्सऍपवर मेसेज करू लागला. हे पिडीत महिलेने आपल्या पतीला सांगितले मात्र, पतीने हा विषय कानामागे टाकला. दरम्यान पती व सासु बाहेर गेले असता दि. १० जानेवारी २०२२ रोजी पिडीत महिला घरी आपल्या खोलीत झोपली होती. त्याचवेळी रात्री आरोपी दिराने आपल्या भावजयला अश्लील मेसेज व व्हिडिओ करत तीच्या खोलीत देखील दिराला पाठीशी घुसत अश्लील वर्तन करू लागला. हे पिडीत महिलेने आपल्या पतीला फोन द्वारे सांगितले. पतीने आल्यावर पाहु असे बोलून फोन कट केला. दि. १६ जानेवारी २०२२ रोजी पती व सासु घरी आले असता त्यांना दिराचा सर्व प्रकार सांगितला. मात्र, पती म्हणाला की हे फक्त मेसेज आणि व्हिडीओच आहेत त्याने काही होत नाही. २२ जानेवारी सिन्नर २०२२ रोजी पिडीत महिला एकटीच लहान बाळाला घेऊन झोपली असताना रात्री १२ ते १ च्या दरम्यान पिडीत महिलेच्या खोलीत बळजबरीने घुसला. आरोपीन तीचे तोंड दाबुन धरत अत्याचार करत जीवे मारण्याची धमकी दिली. पिडीत महिलेने हा सर्व प्रकार आपल्या पतीला व सासुला सांगितला पण त्यांनी घालुन पिडीत महिलेला धमकी दिली. त्यामुळे पिडीत महिलेने हा सर्व प्रकार पोलीस ठाण्यात संगीतला त्यानंतर नराधम दिरासह, पती, सासु, सासरा आशा चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Sangamner Dira’s abused of her brother-in-law

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here