Home संगमनेर संगमनेरात धूमस्टाईलने महिलेच्या गळ्यातील दागिने लांबविले

संगमनेरात धूमस्टाईलने महिलेच्या गळ्यातील दागिने लांबविले

Breaking News | Sangamner Crime: दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल.

Sangamner Dhoomstyle removed the jewels from the woman's neck

संगमनेर: लग्न सोहळ्याच्या गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने धूमस्टाईल महिलेच्या गळ्यातील १० तोळे सोन्याचे गंठण लांबविल्याची घटना काल रविवारी दुपारी पावणे एक वाजेच्या सुमारास गणपती मंदिरासमोरील वसंत लॉन्सजवळ घडली.

सध्या सर्वत्र लग्नाचा धुमधडाका सुरू आहे. शहरातील संगमनेर लोणी रस्त्यावर अनेक मंगल कार्यालय आहेत या ठिकाणी होणाऱ्या गर्दीचा फायदा चोरटे उठवत आहेत. वसंत लॉन्स येथे काही दिवसांपूर्वी दागिने चोरी गेल्याची घटना ताजी असतानाच काल दुपारी पुन्हा दागिने चोरी गेले आहेत. हर्षदा हरिश जावकर (वय ५४) रा. कल्याण ही महिला आपल्या मैत्रिणी सोबत संगमनेर शहरालगच्या गणपती मंदिर येथे रस्त्याने जात होती. यावेळी काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी सदर महिलेच्या गळ्यातील दहा तोळे वजनाचे गंठण हिसकावून तोडून पलायन केले. दागिने चोरी झाल्याने सदर महिलेने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले. याबाबत हर्षदा जावकर यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली या फिर्यादीवरून पोलिसांनी दोन अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा रजि नं २३६/२०२४ भादंवि कलम ३९२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक माळी करीत आहेत. संगमनेर शहर व परिसरात दागिने चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणाबर घडत आहेत. मात्र यातील चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना अपयश येत आहे.

Web Title: Sangamner Dhoomstyle removed the jewels from the woman’s neck

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here