Home संगमनेर संगमनेर: डेरेवाडी- कोकणेवाडी रस्ता खड्डयामुंळे बनला मृत्युच्या सापळा

संगमनेर: डेरेवाडी- कोकणेवाडी रस्ता खड्डयामुंळे बनला मृत्युच्या सापळा

डेरेवाडी- कोकणेवाडी रस्ता खड्डयामुंळे बनला मृत्युच्या सापळा

संगमनेर: –  संगमनेर तालुक्यातील कोल्हार घोटी रोड महामार्गावर असणाऱ्या धांदरफळ बुद्रुक शिवरातील डेरेवाडी ते कोकणेवाडी या रस्त्यावर मोठे-मोठे  खड्डेच खड्डे झाल्याने हा अक्षरश: हा मृत्युचा सापळाच बनला आहे.  त्यामुळे रस्त्यावरुन वाहने चालवतांना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे . खड्डे त्वरीत बुजवावेत अशी मागणी संतप्त ग्रामस्थांनी केली आहे.

You May Also LikeSalman Khan upcoming movies 2018 and 2019 

अनेक दिवसांपासुन धांदळफळ शिवारातील डेरेवाडी ते कोकणेवाडी या रस्त्यावरन मोठमोठे खडडे हुकवायच्या नादात छोटै मोठै अपघातही झाले आहेत. या महामार्गावरील खड्डे पहावे की वाहने चालवावे , असा प्रश्न पडत आहे.  खड्डे बुजवण्यात यावे अशी मागणी अनेक वेळा परिसरातील नागरिकांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे. मात्र याकडे कोणीचे लक्ष दिले नाही. आता वाहन चालकांसह सर्वसामान्य नागरिक वैतागले आहे. काही तरुणांनी निषेध म्हणुन ‘तुम्ही मी  शासन की प्रशासन, मित्रांनो जागे व्हा खड्डे रस्ता हा आपला हक्क मिळवा ‘ असे फलकही महामार्गाच्या कडेला लावला आहे.

या महामार्गावरील खड्डे त्वरीत बुजवण्यात यावेत, अशी मागणी बाळासाहेब देशमाने , दत्ता कासार , अनिल काळे , सुनिल देशमुख, विजय कोल्हे, भानुदास शेटे , रामहरी कातोरे, सुदाम घुले , शुभम घुले, गणेश गायकवाड , गोपीनाथ नाईकवाडी , माधव क्षिरसागर , अवधुत आहेर, अण्णा हासे आदिंसह  ग्रामस्थांनी केली आहे.


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजचा संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here