Sangamner Crime: संगमनेरात तरुणाला मारहाण, चाकूने हल्ला
Sangamner Crime News: चाकूने हल्ला करत त्याला जखमी करण्याचा प्रयत्न, मारहाण.
संगमनेर: 33 वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला करत त्याला जखमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच, त्याला मारहाण करण्यात आली. कासारा-दुमाला रस्त्यावरील एका किराणा दुकानाबाहेर सोमवारी (दि. १८) रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली.
याप्रकरणी संतोष बापू भोसले (रा. कासारा दुमाला, ता. संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आदित्य सूर्यवंशी (रा. अकोले नाका, संगमनेर) याच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सूर्यवंशी याने चाकूने जखमी करण्याचा प्रयत्न केला. त्याने मारहाण केल्याचेही भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.. पोलीस निरीक्षक मुकुंदराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉस्टेबल डी. सोनवणे अधिक तपास करीत आहेत.
Web Title: Sangamner Crime young man was beaten and attacked with a knife