Home संगमनेर नामांकित कंपनीचे बनावट लेबल, गोण्या वापरून बोगस खताची विक्री, संगमनेरातील कृषी सेवा...

नामांकित कंपनीचे बनावट लेबल, गोण्या वापरून बोगस खताची विक्री, संगमनेरातील कृषी सेवा केंद्र चालकावर गुन्हा

Sangamner Crime Sale of bogus fertilizer using fake labels

Sangamner Crime | संगमनेर: संगमनेर शहरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. चक्क नामांकित कंपनीचे बनावट लेबल, गोण्या वापरून बोगस दर्जाच्या खतांची विक्री करून कंपनीला व शेतकऱ्यांना फसविल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती येथील रोहिणी कृषी सेवा केंद्राच्या मालकावर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोहिणी कृषी सेवा केंद्राचे चालक सीताराम मारुती गुंजाळ याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मुंढवा जिल्हा पुणे येथील कंपनीतील अधिकाऱ्याने याबाबत फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नामांकित कंपनीच्या बनावट पिशव्या आणि गोण्या बनवून घेत रोहिणी कृषी सेवा केंद्राच्या चालकाने मालाची विक्री केली. बनावट उत्पादन व दर्जाहीन खताची विक्री केल्यामुळे स्मार्टकम टेक. लिमिटेड कंपनीची मोठी बदनामी झाली. तसेच आर्थिक फटका देखील सहन करावा लागला. याचा शेतकऱ्यांना देखील फटका बसला असून कंपनीची विश्वसाहयाता धोक्यात आणली.

कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी कंपनीचे अधिकारी आझम शहा इबाद शाह यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सीताराम गुंजाळ याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Sangamner Crime Sale of bogus fertilizer using fake labels

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here