संगमनेरातील एका अल्पवयीन मुलीस पळवून नेवून अत्याचार केल्याप्रकरणी १० वर्ष कैद
संगमनेर |Crime News | Sangamner: अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेवून तिच्यावर अत्याचार (Torture and abduction of a minor girl) केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपी सुनील अशोक पवार यास संगमनेर येथील अतिरिक्त सह जिल्हा न्यायाधीश आर. आर. कदम यांनी 10 वर्षे कैदेची शिक्षा ठोठावली आहे.
तालुक्यातील वाघापूर परिसरातून सुनील अशोक पवार (रा. रायते वाघापूर, ता. संगमनेर) याने एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेऊन राहाता तालुक्यातील चंद्रापूर येथे त्याच्या बहिणीकडे सदर मुलीला घेवून गेला. तिथे तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर अत्याचार केला.
मुलीचे आई-वडील हे पोलिसांत तक्रार देणार असल्याची माहिती आरोपीस मिळाल्याने त्याने सदर मुलीला खराडी येथे मुलीच्या नातेवाईकांकडे आणून सोडले. त्यानंतर सदर मुलीने आई-वडिलांना प्रकार कथन केला.
याबाबत अत्याचार पिडीत मुलीने पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल (Crime Filed) केला. तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. उंबरकर यांनी सदर गुन्ह्याचा तपास करुन न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. सदर खटला संगमनेर येथील अतिरिक्त सह जिल्हा न्यायाधीश आर. आर. कदम यांच्यासमोर चालला.
Web Title: Sangamner Crime News Torture and abduction of a minor girl