Crime: संगमनेर: जावयाची सासरच्या मंडळीला बेदम मारहाण, जावयासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
Sangamner Crime | संगमनेर: संगमनेर तालुक्यातील पठार भागात शेंडेवाडी येथे नात्याला लाजवेल अशी घटना घडली आहे. शेंडेवाडी येथे कौटुंबिक वादातून तिघांनी सासरच्या मंडळीला बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवार (ता.३) जून रोजी मध्यरात्री घडली आहे. या प्रकरणी घारगाव पोलिसांनी जावयासह दोघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शेंडेवाडी येथील लक्ष्मीबाई गंगाराम काळे व पती गंगाराम काळे हे दोघे बाहेर ओट्यावर झोपलेले होते. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर जावई मच्छिंद्र मनाजी जाधव, सोनबा विजय जाधव व अनोळखी इसम हे तिघे आले. त्यानंतर जावई मच्छिंद्र जाधव हा सासूस म्हणाला की, तुम्ही तुमच्या मुलीला नांदायला का पाठवत नाही? असे म्हणून सासूच्या हातावर व खुब्यावर मारहाण केली. त्यावेळी सासरा गंगाराम काळे हे उठले असता त्यांना देखील जावयाने शॉकबसरने डोक्यावर मारहाण केली. तसेच सासूचे सासरे व मुलगा हा आरडाओरडा ऐकून बाहेर आले असता त्यांना देखील मारहाण करुन शिवीगाळ केली. याचबरोबर सोनबा विजय जाधव व अनोळखी इसम यांनीही लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ करत दमदाटी केली.
या प्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात सासू लक्ष्मीबाई काळे यांनी फिर्याद दिली असून घारगाव पोलिसांत वरील तिघांविरुद्ध गुरनं.165/2022 भादंवि कलम 326, 324, 323, 504, 506, 427, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संतोष खैरे हे करत आहे.
Web Title: Sangamner Crime Javayachi’s father-in-law’s congregation was beaten