संगमनेर ब्रेकिंग: जिल्हा परिषद माजी सदस्यावर गुन्हा दाखल
Sangamner Crime: नगर (Ahmednagar) जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि इतर दहा ते पंधरा अनोळखी व्यक्तींवर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती कायद्यान्वये गुन्हा दाखल.
संगमनेर: संगमनेर तालुक्यातील आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. नगर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सिताराम पुंजा राऊत आणि त्यांच्यासह इतर दहा ते पंधरा अनोळखी व्यक्तींवर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याने पुन्हा एकदा घुलेवाडी परिसरात खळबळ उडाली आहे.
सिताराम राऊत यांच्यासह संजय पुंजा राऊत, संतोष लहानु राऊत सर्वजण (रा. घुलेवाडी, ता. संगमनेर) व इतर दहा ते पंधरा अनोळखी इसमावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कविता संतोष अभंग (रा. घुलेवाडी, ता. संगमनेर) यांनी याबाबत संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, अभंग यांच्या मालकीच्या रस्त्यावर भाजीपाला विक्रेत्यांना बसावयास परवानगी दिली त्याचा सिताराम राऊत यांना राग येऊन, वाईट वाटून त्यांनी घुलेवाडी तलाठी कार्यालय येथे अभंग यांचा रस्ता अडवून जातीवाचक शिवीगाळ करून अभंग यांच्या घरावर गैर कायद्याचे मंडळी जमवून हल्ला करून घराचे नुकसान केले असे फिर्यादीत म्हंटले आहे.
या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलिसांनी वरील आरोपीविरोधात अनुसूचित जाती जमाती कायदा प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपअधीक्षक राहुल मदने हे करीत आहे.
Web Title: Sangamner Crime has been registered against the former member of Zilla Parishad