संगमनेर: चार जणांकडून डॉक्टरला मारहाण, पाय फ्रॅक्चर
Sangamner Crime: डॉक्टरला चार जणांनी लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना, चौघांवर गुन्हा दाखल.
संगमनेर: संगमनेर शहरातील लिंक रोड भागात एका डॉक्टरला चार जणांनी लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीत डॉ. वसीम तांबोळी यांच्या पायाचा गुडघा फ्रॅक्चर झाला आहे. याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ठाणे येथील खोपट येथे वैद्यकीय व्यवसाय करत असणारे डॉ. वसीम करीम लोबोळी (रा. समनापूर) यांचे वडील अलाईड एज्युकेशन सोसायटी समनापूर अंतर्गत नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल संगमनेर या संस्थेची स्थापना केली आहे. या संस्थेचे सर्व व्यवहार माझ्या नावावर होतात.
या अनुषंगाने रईश अहमद शेख (बेपारी) याने या संस्थेत फेरफार केल्याने न्यायालयात दिवाणी दावे दाखल केलेले असताना लिंक रोड येथील एचडीएफसी बँकेत असलेल्या इंग्लिश मीडियम स्कूलच्या खात्यातून 7 लाख रुपये 16 मार्चला काढले होते. डॉ. तांबोळी यांचा भाऊ कासिम व चुलते नजीर इस्माईल तांबोळी यांच्या सोबत एचडीएफसी बँकेत शाळेच्या खात्यावरील रकमे संदर्भातील चौकशी करण्याकरिता आले होते. यावेळी रईश अहमद शेख हा तेथे आला. मी भाऊ व चुलता यांना समजावून सांगत असताना त्याचा राग येऊन त्याने शिवीगाळ करत धक्काबुक्की करीत बँकेच्याबाहेर ओढत घेऊन आला. अदनान मन्सूर बेपारी, जुबेर आयुब सय्यद आणि फिरोज गुलाब बागवान यांनी मारहाण केली. याप्रकरणी या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Sangamner Crime Doctor beaten up by four persons, leg fractured
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App