Home क्राईम Crime: संगमनेरात पुन्हा गोवंश मांस पकडले

Crime: संगमनेरात पुन्हा गोवंश मांस पकडले

Sangamner Crime Caught beef 

Sangamner Crime | संगमनेर: संगमनेरात पुन्हा जनावरांच्या मांसाची वाहतूक होत असल्याचे उघडकीस आल्याने गोवंश हत्या थांबणार कधी असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलीस उप अधीक्षक राहुल मदने यांना संगमनेरातून गोवंश मांसाची वाहतूक होणार असल्याची खबर मिळाल्याने त्यांच्या पथकाने सापळा रचून संगमनेर तालुक्यातील वडगाव पान शिवारातून पहाटे एका पिकप जीपसह १२०० किलो गोवंश मांस पकडले आहे.

याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एकास अटक करण्यात आली आहे. सुमारे ३ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

संगमनेर मधून एक पांढऱ्या रंगाची पिकअप जीप एम.एच. १४ डीएम ८३७५ गोवंश मांस घेऊन वडगाव शिवारातून कोपरगाव कडे जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचत वडगाव पान शिवारात मोरे विद्यालयाजवळ सापळा रचून पहाटे दोन वाजेच्या सुमारास जीप पकडली. या जीपमध्ये भुश्याच्या गोण्याखाली गोमांस लपवून वाहतूक करीत असल्याचे आढळून आले. त्यानंतर गाडी व मांस ताब्यात घेण्यात आले.

मोसिन अन्वर कुरेशी वय ३१ रा. भारतनगर संगमनेर आणि तोसिफ ताहीर कुरेशी रा. भारतनगर संगमनेर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

जीप चालक मोसिन अन्वर कुरेशी यास अटक करण्यात आली आहे. पोलीस नाईक अण्णासाहेब दातीर यांनी याबाबाबत फिर्याद दिली असून यावरून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Sangamner Crime Caught beef 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here