संगमनेर: व्यापाऱ्यास सहा जणांकडून मारहाण
Breaking News | Sangamner Crime: कोंबड्या खरेदीसाठी गेले असता अज्ञात पाच ते सहा जणांनी त्यांना दमबाजी, शिवीगाळ करुन मारहाण केल्याची घटना.
संगमनेर: शहरातील अलकानगर येथील व्यापारी कोल्हेवाडी येथे कोंबड्या खरेदीसाठी गेले असता अज्ञात पाच ते सहा जणांनी त्यांना दमबाजी, शिवीगाळ करुन मारहाण केल्याची घटना घडली आहे. यावेळी खिशातील ४१ हजार ३०० रुपये काढून घेत जीपचे नुकसानही केले. सदर घटना गुरुवार दि. २१ मार्च रोजी रात्री ८ वाजता घडली. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांकडून तालुका मिळालेली अधिक माहिती अशी, कय्युम इनाम पठाण (वय ३४) हे कोंबड्या खरेदीसाठी जीप (क्र. एमएच.०४, जेके ७३७५) मधून फरहान शेख याच्या सोबत गेले होते. त्यावेळी कोल्हेवाडी येथे ‘तू येथे का आला?’ असे म्हणून अज्ञात पाच ते सहा जणांनी त्यांना शिवीगाळ करुन मारहाण केली. तसेच पठाण यांच्या खिशातून ४१ हजार ३०० रुपये काढून घेत लाकडी दांड्याने जीपच्या काचा फोडल्या. ते कोकणगाव मार्गे समनापूर येथे आले असता पठाण यांचा भाऊ मोबाइलमध्ये शूटींग काढत असताना त्या अज्ञातांनी त्यांचा मोबाईल काढून घेतला. याप्रकरणी कय्युम पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तालुका पोलिसांनी वरील ५ ते ६ अज्ञातांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्यामोलिन सातपुते हे करत आहे. दरम्यान या घटनेतील महेश खुळे या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
Web Title: Sangamner crime businessman was beaten up by six people
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study