संगमनेर तालुक्यात कोरोना रोखण्यासाठी कठोर कारवाईचे हे नवे निर्बंध: तहसीलदार
संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात वाढता कोरोना पार्श्वभूमीवर महसूल विभागासह पोलीस प्रशासनही सतर्क झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करीत विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. ‘कोरोनापासून बचाव करण्याचा प्राथमिक उपाय म्हणजे मास्क वापरणे. शहरात दुचाकी चार चाकी वाहन चालक प्रवासी तसेच रस्त्याने पायी जाणारे अनेक जण विना मास्क दिसतात. प्रशासनाने कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही नियम घातले आहेत. त्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर पोलीस प्रशानासनाकडून कारवाई करण्यात येत आहे.
संगमनेर तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रभाव दिसता आहे. नियमांचे उलंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल अशी भूमिका प्रशासनाने घेतली आहे. संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांनी याबाबत आदेश काढले आहे.
प्रत्येकाने मास्क वापरणे सक्तीचे केले आहे. दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. अथवा फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहे.
रुग्णांच्या संपर्कातील कोरोना चाचणी केलेल्या व्यक्तींना त्यांचा कोरोना अहवाल प्राप्त होईपर्यंत गृहविलगीकरण किंवा संस्थांनी विलगीकरण कक्षात राहावे लागणार आहे.
हंसने-हंसाने का ये सिलसिला… पढिये डेली टॉप 5 – हिंदी जोक्स
कोरना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी गृहविलगीकरण पूर्णपणे बंद करण्यात आले आहे.
तलाठी आणि ग्रामसेवक यांना अंमलबजावणी करावी लागणार आहे. अन्यथा त्यांच्यावर कारवाई होणार आहे.
संगमनेर तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या संपर्कातील आरटीपीसीआर स्वब दिलेल्या व्यक्तींना गृहविलगीकरण किंवा संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्याची जबाबदारी तालुक्यातील तलाठी व ग्रामसेवकांना दिली आहे. त्यानुसार प्रत्येक तलाठ्याने आपल्या कार्यक्षेत्रातील आरटीपीसीआर स्वब दिलेल्या व्यक्तीना विलागीकारणात ठेवावे. आरटीपीसीआर स्वब दिलेली व्यक्ती इतरत्र कोठेही आढळून येणार नाही याची जबाबदारी घ्यावी. संबंधित व्यक्ती इतरत्र कोठेही आढळून आल्यास त्या गावाच्या तलाठ्याविरुद्ध कारवाई होणार आहे.
तसेच संगमनेर तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी गृहविलगीकरण पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. त्यानुसार आता कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती घरीच राहून कोरोनाचे उपचार घेणार नाहीत.
प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी केले आहे.
Web Title: Sangamner Coronavirus new restrictions of drastic action