Home महाराष्ट्र शेतकरी विरोधी कायदे मागे घेण्यासाठी कॉंग्रेस पक्ष लढणार: बाळासाहेब थोरात

शेतकरी विरोधी कायदे मागे घेण्यासाठी कॉंग्रेस पक्ष लढणार: बाळासाहेब थोरात

Sangamner Congress party will fight for the repeal of anti-farmer laws

संगमनेर | Sangamner: केंद्रसरकार नेहमी लोकशाहीची मुल्य तुडवत आहे. कृषी सुधारणा विधेयकांना सर्वपक्षीय खासदारांचा विरोध असताना देखील विरोधी पक्षाच्या सदस्यांना निलंबित करून विधेयक मंजूर करून घेतली. कॉंग्रेस पक्ष हा शेतकऱ्यासोबत असून कायदे मागे घेईपर्यंत लढत राहणार आहे असा इशारा महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रस कमिटीचे अध्यक्ष, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे. त्यानी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी मोहीम हाती घेतली आहे.

शेतकरी विरोधी काळे कायदे मागे घेण्यासाठी कॉंग्रेस पक्ष राज्यभर मोर्चे, आंदोलने करणार आहे. राज्यपाल यांना भेटून निवेदन देणार, एक कोटी सह्यांचे निवेदन राष्ट्रपतींना पाठविणार आहे. शेतकर वर्गाला न्याय मिळेपर्यंत कॉंग्रेस पक्ष केंद्रसरकार भाजप विरोधात संघर्ष करत राहणार आहे असेही महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

कॉंग्रेसने आंदोलन सुरु केली आहेत. राज्यभर ही मोहीम ऑनलाईन मार्गाने हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत कॉंग्रेस पक्षाचे नेते, पदाधिकारी, शेतकरी, कार्यकर्ते मोठया संख्येने सहभागी झाले आहेत. या मोहिमेला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. शेतकरी विरोधी धोरणाची तीव्र निषेध करून मागे घेण्याची मागणी व्हिडियो अपलोड माध्यमातून करण्यात आली आहे.  

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, and  Latest Marathi News

Web Title: Sangamner Congress party will fight for the repeal of anti-farmer laws: Balasaheb Thorat

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here