संगमनेर: नाशिक पुणे महामार्गावर सीएनजी गॅस वाहतूक करणारा टेम्पो उलटला
संगमनेर | Accident: सीएनजी गॅस वाहतूक करणारा आयशर टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्याने नशिक पुणे महामार्गावर पुणेहून नाशिकडे जाणारा कुरकुंडी गावाच्या हद्दीत पलटी झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात चालक जखमी झाला आहे. शनिवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास हा अपघात घडला.
पुणेहून नाशिकच्या दिशेने जाणारा सीएनजी गॅस वाहतूक करणारा (एम.एच.१ जे.एल. ३१९२) संगमनेर तालुक्यातील कुरकुंडी गावच्या हद्दीत जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने आयशर वेगात रस्त्यालगत पलटी झाला आहे. त्यामुळे सीएनजी गॅस गळती सुरु झाली.
सीएनजी गॅस गळती सुरु झाल्याने पुणेहून नाशिकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली होती. संगमनेर महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. सकाळी सीएनजी गॅस गळती बंद करण्यात आल्याने वाहतूक सुरळीत करण्यात आली.
या घटनेची माहिती मिळताच महामार्ग डोळासने मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र यांसह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. चालक अमोल बारावे रा. वाशीम हे जखमी झाल्याने संगमनेर येथे रुग्णालयात पाठविण्यात आले.
Web Title: Sangamner CNG gas Tempo Accident