संगमनेरकरांना पावसाने झोडपले, रस्त्याला नदीचे स्वरूप
संगमनेर | Sangamner: संगमनेर शहरात अक्षरशः पावसाने जोरदार हजेरी लावत रस्त्यावर पाणीच पाणी वाहत आहे. विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाउस कोसळला. या पावसाने शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली जाऊन व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले. आहे. अनेक ठिकाणी गटारीचे पाणी उन्मळून रस्त्यावर आले आहे. रस्त्याला नदी ओढ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
रस्त्यावर प्रचंड पाणी साठल्याने अनेक ठिकाणी वाहने बंद पडली आहे. शहराची दुरवस्था पाहून पालिकेचा कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.
आज दुपारी एक वाजेच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली. शनिवार बाजार दिवस असल्याने छोट्या व्यावसायिक यांची चांगलीच धांदल उडाली. या तलावाचे फोटो, व्हिडियो नेटकर्यांनी सोशियल मेडीयावर टाकत पालिकेचा कारभार चव्हाट्यावर आणला आहे. नागरिकांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे.
Web Title: Sangamner city heavy rain