Home संगमनेर संगमनेर शहरात बाधितांची संख्या घटली तर गुंजाळवाडी येथे बाधित वाढले

संगमनेर शहरात बाधितांची संख्या घटली तर गुंजाळवाडी येथे बाधित वाढले

Sangamner city decrease patient Gunjalwadi incresed

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात सोमवारी प्राप्त अहवालात 30 करोनाबाधित आढळून आले. यामध्ये शहरामधील संख्या घटली आहेत तर गुंजाळवाडी परिसरात रुग्णांची संख्या वाढली आहे. गुंजाळ वाडी येथे तब्बल सात रुग्ण आढळून आले आहेत.

सोमवारी प्राप्त झालेल्या अहवालात शहरात घोडेकर मळा येथे 65 वर्षीय पुरुष, सावतामाळी नगर येथे 37 वर्षीय महिला, गोविंद नगर येथे 71 वर्षीय पुरुष अहवाल करोनाबाधित आला आहे.

तर तालुक्यात डेरेवाडी मधील 65 वर्षीय महिला, धांदरफळ बुद्रुक येथील 51 वर्षीय पुरुष,  निमगाव जाळी येथे 55 वर्षीय पुरुष, 34 वर्षीय महिला, रहिमपूर येथे 62 वर्षीय पुरुष, प्रतापपूर येथील 84, 79, 65 वर्षीय पुरुष, 25, 23 वर्षीय तरुण, चिंचपूर येथे 50 वर्षीय महिला, 7 वर्षीय बालिका, नान्नज दुमाला येथे 38 वर्षीय महिला,  गुंजाळवाडी येथे 75, 65, 60 वर्षीय पुरुष, 35, 30, 23 वर्षीय पुरुष, 80 वर्षीय महिला,  घुलेवाडी येथे  24 वर्षीय महिला, जोर्वे येथे 45 वर्षीय पुरुष, अकलापुर येथे 74 वर्षीय महिला, साकुर येथील 54 वर्षीय पुरुष, 48 वर्षीय महिला, तळेगाव दिघे येथे 17 वर्षीय तरुणी, सारोळे पठार येथे 40 वर्षीय पुरुष असे 30 अहवाल बाधित आढळून आले आहेत. तालुक्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या 3,455 इतकी झाली आहे.  

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and  Latest Marathi News

Web Title: Sangamner city decrease patient Gunjalwadi incresed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here