Theft: संगमनेर शहरात बुलेट दुचाकीची चोरी
Ahmednagar News Live | संगमनेर | Sangamner Theft: शहरातील मालदाड रोड येथील सौभाग्य मंगल कार्यालय पाठीमागे राहत असलेल्या उमेश दत्तात्रय राहणे यांची बुलेट मोटारसायकल त्यांच्या घरासमोरून अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. संगमनेर तालुक्यात मोटारसायकल चोरीच्या घटना वाढल्या आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत माहिती अशी की, उमेश राहणे यांनी त्यांच्या मालकीची अंदाजे हजार रुपये किमतीचे ब्राऊन कलरची बुलेट मोटारसायकल क्रमांक एम.एच. १७ सी.जी. ७९४ ही २७ डिसेंबर रोजी नेहमीप्रमाणे आपल्या घरासमोर उभी केली होती. एका पाहुण्यांच्या लग्नासाठी सर्व जण पंकज लोन्स येथे गेलो होतो. रात्री घरी आल्यावर बुलेटकडे कोणाचे लक्ष गेले नाही. मात्र दुसऱ्या दिवशी आपली बुलेट जागेवर नसल्याचे लक्षात आले. आजूबाजूला चौकशी करून शोध घेतला असता मिळून आली नाही. याप्रकरणी उमेश राहणे याने शहर पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Web Title: Sangamner City bullet theft