धक्कादायक: संगमनेर तालुक्यात एका महिलेचे दोघांनी केले अपहरण
संगमनेर | Sangamner Breaking: संगमनेर तालुक्यातील शिरसगाव येथे असलेल्या पांढरे वस्ती येथील एका महिलेचे अज्ञात कारणावरून खून करण्याच्या हेतूने अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील शिरसगाव येथील पांढरे वस्ती येथे राहत असलेली एका भोजने या महिलेचे अज्ञात कारणावरून खून करण्याच्या हेतूने अपहरण करण्यात आले आहे. चंद्रभान चांगदेव चौधरी रा. शिरसगाव ता. संगमनेर व सुभाष नाना सूर्यवंशी रा. लिंगदेव ता. अकोले या दोघांनी संगनमताने या महिलेचे अपहरण केले आहे.
याप्रकरणी दिनेश भोजणे याने याबाबत संगमनेर तालुका पोलिसांत फिर्याद दिली असून या फिर्यादीवरून या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. अधिक तपास पोलीस उपाधीक्षक राहुल मदने हे करीत आहे.
Web Title: Sangamner Breaking A woman was abducted by two men