संगमनेर: वनविभागाचे रेस्क्यू ऑपरेशन सुरु असताना बिबट्याचा विहिरीत पडून मृत्यू
संगमनेर | Sangamner: गुरुवारी सकाळी नाशिक पुणे महामार्गावर जवळे वस्ती ता. संगमनेर येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या जखमी झाल्याची घटना घडली.
संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाट परिसरात जावळे वस्ती येथे महामार्ग ओलांडण्याच्या नादात अज्ञात वाहनाने बिबट्याला जोराची धडक दिली. या अपघातात बिबट्या गंभीर अवस्थेत लगतच्या शेतात जाऊन विसावला. ही बाब ग्रामस्थ व प्रवाशांच्या लक्षात आल्याने याबाबत वन विभागाला माहिती देण्यात आली. बिबट्या पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.
- वाचा: कॉमेडी जोक्स
वनपाल रामदास डोंगरे व वनरक्षक यांनी घटनास्थळी धाव घेतली. पिंजरा लावून बिबट्याला ताब्यात घेण्यासाठी वन विभागाचे रेस्क्यू ऑपरेशन सुरु असताना बिबट्याने तेथेन पळ काढण्याच्या प्रयत्नात काही अंतरावर असलेल्या विहिरीत बिबट्या पडला. बिबट्याला वाचविण्यासाठी वन विभागाने शर्थीचे प्रयत्न केले मात्र विहिरीत पाणी जास्त असल्याने बिबट्याचा मृत्यू झाला.
Web Title: Sangamner Bibatya falls into a well and dies