संगमनेर तालुक्यात बिबट्याने अडविला पोलिसांचा रस्ता अन झाले असे काही
संगमनेर | Sangamner: तालुक्यातील साकुर मांडवे रस्त्यावर सोमवारी रात्री एक वाजेच्या सुमारास घारगाव पोलिसांना अचानक बिबट्या आडवा होऊन पोलिसांची वाट रोखून धरल्याची घटना घडली आहे.
घारगाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे आसपासच्या नागरिकांना बोलावून बिबट्याला पिटाळून लावले मात्र यात कुत्र्याचा जीव वाचविण्यात अपयश आले.
याबाबत अधिक माहिती अशी अशी की, साकुर परिसरातील मांडवे शिवारात घारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक संतोष फड, कॉन्स्टेबल प्रमोद चव्हाण, हरीशचंद्र बांडे, मोहम्मद सय्यद हे सोमवारी रात्री पेट्रोलिंग करीत होते. त्यांनतर साकुरकडे जात असताना लिंब फाट्यापासून काही अंतरावर अचानक वाहनासमोर बिबट्या अडवा झाला. या बिबट्याने जवळपास १० मिनिटे रस्ता अडवून धरला. मात्र चौघांनी धाडस करीत आसपासच्या नागरिकांना सतर्क तेथील याकुब भोसले यांच्या घरासमोर असलेल्या कुत्र्यावर बिबट्याने हल्ला करीत जागीच ठार केले. दुर्दैवाने कुत्र्याला वाचविणे अपयश आले. साकुर परिसरात बिबट्यांचा संचार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याअगोदरही अनेकवेळा बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत.
Web Title: Sangamner Bibatya blocked the police road