Home संगमनेर संगमनेर: चिमुकल्यावर बिबट्याचा हल्ला

संगमनेर: चिमुकल्यावर बिबट्याचा हल्ला

Breaking News | Sangamner: घरासमोरील ओट्यावर खेळत असणाऱ्या चार वर्षांच्या बालकावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना.

Sangamner Bibatya attack on toddler

संगमनेर: घरासमोरील ओट्यावर खेळत असणाऱ्या चार वर्षांच्या बालकावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना नुकतीच संगमनेर तालुक्यातील निमगाव टेंभी गावामध्ये घडली आहे. मात्र ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे हा मुलगा बचावला आहे.

विपुल चेतन सूर्यवंशी (वय ४) हा मुलगा गावातील शाळेच्या समोरील मुख्य चौकात असणाऱ्या घरासमोरील ओट्यावर खेळत होता. रात्री साडेआठच्या सुमारास बिबट्याने अचानक त्याच्यावर हल्ला केला. हा बिबट्या मुलाच्या मानेला पकडून ओढून घेऊन चालला होता. यामुळे त्याने आरडाओरड केली. परिसरातील नागरिकांनी सतर्कता व प्रसंगावधान दाखवून या बिबट्याला हुसकावून लावले. या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या घटनेने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Web Title: Sangamner Bibatya attack on toddler

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here