संगमनेर तांबे हॉस्पिटल मार्गे गुंजाळवाडीचा संपर्क तुटला, बटवाल मळा परिसरात अनेक घरात पाणी शिरले
संगमनेर |Sangamner | प्रतिनिधी ज्ञानेश्वर गायकर पाटील: रात्री १२ च्या सुमारास संगमनेर परिसरात मेघ गर्जना सह धुवाधार पाऊस झाला असून, अनेक गावांचा , वस्त्याचा संपर्क तुडला असून , इदगा रोड मार्गे गुंजाळ वाडी कडे जाणारा रस्ता, राहणे मळा रस्ता , जगताप वस्ती रस्ता पूर्ण पाण्याखाली असून, लक्ष्मी नगर, बटवाल मळा परिसरात घरांनी पाणी शिरले असावे असा प्राथमिक अंदाज आहे. मेडिकेअर हॉस्पिटल चा रस्ता पूर्ण पाण्याखाली असून , ओढ्यातील अतिक्रमण यास कारणीभूत आहे ,अशी नागरिकांची भावना आहे. मेडीकेअर समोरील एका छोट्या पुलात पाणी न गेल्याने ,मागे पाण्याचा मोठा फुगवटा झाला असल्याचे ही निदर्शनास आले आहे. गुंजाळ वाडी गावाचा व संगमनेरकर यांचा महा मार्ग कडे जाण्याचा रस्ता सकाळी आठ वाजेपर्यंत बंद असून , परिसरातील अनेक घरात पाणी शिरले असावे असा अंदाज व्यक्त होत असून , विद्युत विभागाच्या अनेक ट्रान्सफॉर्मर ही या विभागात पाण्याखाली गेले आहेत. शासकीय अधिकारी अद्याप घटना स्थळी पोहचले नसून , प्राथमिक अंदाज नुसार अनेक घरात पाणी गेल्याने मोठे नुकसान झाले असावे.
रात्री बाराच्या सुमारास प्रचंड मेघ गर्जना करत वरून राज संगमनेरकर यांच्या वर बरसले. अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेल्या ओढे नाले यांनी पाण्याचा मोठा फुगवटा तयार झाला. म्हाळुंगी नदी कडे जाणारे पाणी अतिक्रमण मुळे रस्त्यावर आले, व लक्ष्मी नगर, राहणे मळा, देवाचा मळा , बटवल मळा क्षणात पाण्या खाली गेले.. रात्र असल्याने नागरिकांना पावसाचा अंदाज नाही आला.मात्र पहाटे पाऊस उघडताच सर्वत्र पावसाचा अहकार दिसला. ओढ्यानी पाणी जाण्यास रस्ता नसल्याने पाण्याने वाहतुकीचा रस्ता सोयीस्कर निवडला असून , या पेक्षा मोठा पाऊस झाला असता तर संगमनेर चे सांगली कोल्हापूर झाले असते. संगमनेर परिसरातील सर्व ओड्यांची अतिक्रमणे तातडीने हलवावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
Web Title: Sangamner at night heavy rain