Home अकोले संगमनेर व अकोले तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी, नागरिकांना दिलासा- rRain

संगमनेर व अकोले तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी, नागरिकांना दिलासा- rRain

Sangamner Akole taluka rain News

Ahmednagar News | संगमनेर: बुधवारी संगमनेर व अकोले तालुक्यात अवकाळी पावसाने (Rain) हजेरी लावली आहे. काही गावांना अवकाळी पाउस शेतीच्या मशागतीसाठी फायदेशीर झाला आहे. मे महिना संपत आला तरी उकाडा मोठ्या प्रमाणात जाणवत होता. बुधवारी दिवसभर मोठ्या प्रमाणात उष्णता होती. हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविला होता.

संगमनेर पठार भागात घारगाव येथे मुसळधार पाऊस झाला. अकोले शहरात देखील सायंकाळी एक तास मुसळधार पावसाने हजेरी लावली. यावेळी मोठ्या प्रमाणात वादळी वारे वाहत होते. काही गावांत मध्यम स्वरूपाचा पाउस झाला तर काही ठिकाणी गारपीट झाली आहे. काही गावांत मुसळधार पाऊस झाला आहे. सध्या शेतातील पिकांना पाण्याचा तुटवडा जाणवत होता. अशा वेळी अवकाळी पावसाने पिकांना जीवदान ठरले आहे. या पावसाने शेतातील ढेकूळ फुटून शेत मशागतीसाठी मोठा फलदायी ठरत आहे. नागरिकांना उकाड्याने झालेल्या नागरिकांना या पावसाने दिलासा दिला आहे.  हवेत गारवा निर्माण झाला आहे.

Web Title: Sangamner Akole taluka rain News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here