संगमनेर: अल्पवयीन मुलीस पळवून नेणाऱ्या आरोपीस अटक
संगमनेर | Sangamner: मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने मंगळवारी संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथून अल्पवयीन मुलीस पळवून नेणाऱ्या आरोपीस व सदर मुलीस ताब्यात घेतले आहे.
गणेश महादू अल्हाट वय २६ असे या आरोपीचे नाव आहे. आरोपी गणेश यास पुढील कारवाईसाठी लोणी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तर सदर मुलीस तिचे नातेवाईक यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
याबाबत माहिती अशी की, गणेश महादू अल्हाट याने २७ जुलै २०१७ रोजी लोणी पोलीस स्टेशन हद्दीतून एका अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेले होते. याप्रकरणी मुलीच्या नातेवाईकांनी लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
स्थानिक पोलिसांना सदर प्रकरणाचा तपास न लागल्याने हे प्रकरण अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे वर्ग करण्यात आले होते. कक्षाचे पोलीस निरीक्षक वसंत पथवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ कांबळे व त्यांच्या पथकाने गणेश अल्हाट व सदर मुलीचा तपास करून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, and Latest Marathi News
Web Title: Sangamner Accused of kidnapping minor girl arrested