Home Accident News संगमनेर: भरधाव स्विफ्ट कार चालकाने दोघांना उडविले, दोघांचा मृत्यू

संगमनेर: भरधाव स्विफ्ट कार चालकाने दोघांना उडविले, दोघांचा मृत्यू

Sangamner Accident:  भरधाव स्विफ्ट कार चालकाने नाशिक पुणे बाह्यवळण रस्त्यावर दोघा परप्रांतीय मजुरांना उडविल्याची घटना. भीषण अपघात.

Sangamner Accident Speeding Swift car driver hits two, kills two

संगमनेर : भरधाव स्विफ्ट कार चालकाने नाशिक पुणे बाह्यवळण रस्त्यावर दोघा परप्रांतीय मजुरांना उडविल्याची घटना संगमनेरमध्ये मंगळवारी संध्याकाळी घडली. अपघातामध्ये दोघाही मजुरांचा मृत्यू झाला. नाशिकच्या एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गिरीजा मुनसी तुरिया, वय 52 वर्ष आणि सुरेश चेतू खैरवार वय 55 वर्ष (दोघे रा. गहलोर बडकी, मरकाना बिहार) असे मृत झालेल्या मजुरांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, संगमनेर शहराबाहेरून जाणाऱ्या नाशिक पुणे महामार्गावर दुरुस्तीचे काम सुरू आहे. रस्त्यावर बॅरिकेट लावून काही मजूर हे काम करत आहेत. मंगळवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मालपाणी इस्टेट जवळ या मार्गावरून भरधाव वेगाने जाणाऱ्या स्विफ्ट कार चालकाने डिव्हायडरला लावलेले तोडून रस्त्यावर काम करणाऱ्या गिरीजा मुनसी तुरिया, वय 52 वर्ष आणि सुरेश चेतू खैरवार वय 55 वर्ष (दोघे रा. गहलोर बडकी, मरकाना बिहार) यांना गंभीर जखमी केले. अपघातात दोघेही मजुरांचा मृत्यू झाला आहे.

याबाबत संगमनेर शहर पोलीस ठाण्यात या कामाचा सुपरवायझर असलेल्या अमोल सुभाष बनसोडे ह. रा. आनंदवाडी, चंदनापुरी ता. संगमनेर) याने दिलेल्या फिर्यादीवरून स्विफ्ट कार चालक निशिकांत संजय घोडेकर, रा. सावरकर उद्यानामागे, पंचवटी, नाशिक याच्या विरोधात अपघात करून दोघा मजुरांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास शहर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक धनंजय महाले करत आहेत.

Web Title: Sangamner Accident Speeding Swift car driver hits two, kills two

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here