संगमनेर: गुंजाळवाडी शिवारात ट्रॅक्टर व पिकअपची धडक, एक ठार
Sangamner | संगमनेर: संगमनेर तालुक्यातील नाशिक पुणे महामार्गावर गुंजाळवाडी शिवारात राजापूर जाणाऱ्या अंडर पास पुलाजवळ उसाने भरलेला ट्रॅक्टर व पिकअपची धडक होऊन भीषण अपघात (Accident)झाला. या अपघातात पिकअप क्लीनर राहुल पाटील वय २७ रा. जळगाव हा जागीच ठार तर एक जण जखमी झाला आहे. आज शुक्रवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास हा अपघात घडला.
याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिक पुणे महामार्गावर गुंजाळवाडी शिवारात संगमनेर ते राजापूर रस्त्यादरम्यान हॉटेल जत्राजवळ ऊसाने भरलेला ट्रॅक्टर क्रमांक एम.एच. १७ एव्ही ८२५७ वरील चालक संभाजी चिमाजी दाळे वय ३९ ता. पारनेर हा नाशिकच्या दिशेने जात होता. पाठीमागून येणार पिकअप क्रमांक जी.जे. ०५ बीव्ही ८२१२ यांच्यात धडक बसून भीषण अपघात झाला. यामध्ये पिकअप क्लीनर राहुल पाटील वय २७ रा. जळगाव हा जागीच ठार तर चालक प्रभाकर सुरेश पाटील वय २४ रा. जळगाव हा जखमी झाला आहे. त्यांना रुग्णवाहिकेत घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या अपघाताची माहिती समजताच पोलीस नाईक नंदकुमार बर्डे यांनी घटनास्थळी धाव घेत उपाययोजना केल्या. या अपघाताचा अधिक तपास संगमनेर शहर पोलीस करीत आहे.
Web Title: Sangamner Accident One killed in tractor and pickup collision in Gunjalwadi