Accident | संगमनेर: भरधाव कारच्या धडकेत पिता पुत्र गंभीर जखमी
Sangamner | संगमनेर: भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. या अपघातात (Accident) पिता पुत्र दोघेही गंभीर जखमी झाले. संगमनेर तालुक्यातील घारगाव शिवारात उप रस्त्यावर रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला.
चंद्रकांत पोपट गायकवाड वय ४० व आयुष चंद्रकांत गायकवाड वय १० रा. घारगाव असे या अपघातात गंभीर जखमी झालेल्या पिता पुत्राचे नाव आहे.
जगदीश धोंडीबा धात्रक वय ३६ यांनी दिलेल्याफिर्यादीवरून अज्ञात कारचालकाविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात कारचालक भरधाव वेगाने जात होता. त्याचे कारवरील नियंत्रण सुटल्याने समोर चाललेल्या दुचाकीला कारने पाठीमागून जोराची धडक दिली. यामध्ये दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.
Web Title: Sangamner Accident Father and son seriously injured in car crash