Home संगमनेर संगमनेर शहरात एका भामट्याने बनाव रचून महिलेचे दागिने लुटले

संगमनेर शहरात एका भामट्याने बनाव रचून महिलेचे दागिने लुटले

Sangamner a woman was robbed of her jewelry by a vagrant

संगमनेर | Sangamner: संगमनेर शहरातील मालदाड रोड येथील समर्थ नगर येथील एका महिलेला दागिने स्वच्छ करून देतो असल्याचा बनाव करून भामट्याने फसविल्याची घटना घडली आहे. मंगळवारी दि. रोजी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे.

यामध्ये या अज्ञात भामट्याने मिनी गंठण व साखळी घेऊन पसार झाला आहे. याप्रकरणी सुनीता भिकाजी नेहे वय ६० यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून यावरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अज्ञात भामट्याने सुरुवातीला सोन्याचे दागिने स्वच्छ देणार असल्याचा बनाव रचत इतर भांडी स्वच्छ करून महिलेचा विश्वास संपादन केला. आणि सदर महिलेचे साडे चार हजार रुपयाचे मिनी गंठण व एक तोळा वजानाची तीस हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी घेऊन पोबारा केला. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी फटांगरे हे करत आहे.

Web Title: Sangamner a woman was robbed of her jewelry by a vagrant

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here