सिनेमास्टाईल ने पाठलाग करून वाळू तस्काराचा गोळी झाडून खून, रेल्वे फाटकावर थरार
वाळूच्या व्यवसायातून मोक्काचा आरोपी असलेल्या एका वाळू तस्कराची गोळ्या झाडून निर्घृण हत्या केल्याची घटना.
भंडारा : वाळूच्या व्यवसायातून मोक्काचा आरोपी असलेल्या एका वाळू तस्कराची गोळ्या झाडून निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना भंडारा जिह्यातील तुमसर तालुक्यातील गोबरवाही येथे रेल्वे क्रॉसिंगजवळ सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. नईम खान (55) रा. तुमसर असे गोळीबारात मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
नईम खान याच्यावर तुमसर पोलिसात मोक्कासह विविध गुन्हे दाखल आहेत. मागील अनेक वर्षांपासून ते वाळूचा व्यवसाय करत होता. त्यामुळे वाळूच्या व्यवसायात त्याची अनेकांशी स्पर्धा वाढली होती. यात त्याच्या साथीदारांनी वर्चस्व वाढवण्यासाठी अनेकांशी वाद वाढवून घेतले. यातूनच तुमसर येथे व्यावसायिक टोळीयुद्ध सुरू झाले. याच कारणातून नईम याच्यावर हा हल्ला करण्यात आल्याची माहिती आहे. नईम हा त्याच्या गाडीने गोबरवाहीकडे जात होता. यावेळी दुसऱ्या गाडीतून अज्ञात आरोपींनी त्याच्या गाडीचा पाठलाग केला.
नईम याचे वाहन गोबरवाही गावाजवळील रेल्वे क्रॉसिंगजवळ पोहचल्यावर मागावर असलेल्या हल्लेखोरांनी त्याच्यावर बंदुकीतून गोळीबार केला. यात नईम खान रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
दररोजच्या बातम्या मिळविण्यासाठी आमचा ग्रुप जॉईन करा. संगमनेर अकोले न्यूज
या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रश्मिता राव, गोबरवाही ठाणेदार नितीन मदनकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन चिंचोलकर हे आपल्या पोलीस पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणातील गुन्हेगारांचा शोध पोलीस करीत आहे.
Web Title: Sand Smuggler was shot and Murder in a cinema-style chase
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App