Home अहमदनगर ‘समृद्धी’ मार्गे लालपरी ‘साईंच्या दारी; इतक्या तासांत कापले ५४० किमी अंतर

‘समृद्धी’ मार्गे लालपरी ‘साईंच्या दारी; इतक्या तासांत कापले ५४० किमी अंतर

Samruddhi Highway:  ताशी ८० किलोमीटरच्या वेगाने निघालेल्या बसला गणेशपेठ आगार (नागपूर) ते शिर्डी दरम्यानचे ५४० किलोमीटर अंतर.

Samruddhi Highway via Lalpari 'Sai's Dari; 540 km distance covered

शिर्डी:  हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर आज नागपूर ते शिर्डी दरम्यान महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची पहिली बस धावली. जलद व आरामदायी प्रवाशाचा २० व्यक्‍तिंनी आनंद घेतला. नागपूरच्या गणेशपेठ आगारातून १५ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता निघालेली बस (एमएच ०९, एफएल ०२४८) शिर्डी बस स्थानकावर १६ डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजता पोहचली. ताशी ८० किलोमीटरच्या वेगाने निघालेल्या बसला गणेशपेठ आगार (नागपूर) ते शिर्डी दरम्यानचे ५४० किलोमीटर अंतर कापण्यास सात तास लागले. आज हीच बस रात्री ९ वाजता शिर्डीहून नागपूरकडे प्रस्थान करणार आहे‌ .

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ डिसेंबर रोजी समृध्दी महामार्गावरील नागपूर ते शिर्डी दरम्यान पहिल्या टप्प्यातील वाहतूक व दळणवळण सेवेचे लोकार्पण केले. त्यानंतर आज राज्य परिवहन महामंडळाची पहिली बस गणेशपेठ आगार (नागपूर) ते शिर्डी दरम्यान धावली. ४५ आसन क्षमतेच्या निम आरामदायी बसमध्ये ३० आसने ( पुशबॅक पध्दतीची ) बसण्यासाठी व १५ शयन आसने ( Sleeper) उपलब्ध होती. या बसमधून २० व्यक्तिंनी प्रवास केला. त्यापैकी १३ आरक्षित प्रवासी, ६ ज्येष्ठ नागरिक (७५ वर्षाच्या पूढील) व १ अनारक्षित प्रवासी होते‌. बससेवेसाठी प्रौढ व्यक्ती १३०० रूपये इतके प्रवासभाडे आकारण्यात आले. तसेच ७५ वर्षावरील ज्येष्ठांना मोफत प्रवास सवलत देण्यात आली.

Earn Money Online | सोशियल मेडिया मनोरंजनासोबत पैसे कमविण्याचा फंडा | जाणून घ्या

या बससाठी शैलेश खोब्रागडे व भारत भदाडे असे दोन चालक होते. अशी माहिती या बसचे वाहक मनोज तुपपट यांनी दिली.

Web Title: Samruddhi Highway via Lalpari ‘Sai’s Dari; 540 km distance covered

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here