Home अहिल्यानगर दारुसाठी पैसे दिले नाही म्हणून साई संस्थान कर्मचाऱ्यावर चाकू हल्ला

दारुसाठी पैसे दिले नाही म्हणून साई संस्थान कर्मचाऱ्यावर चाकू हल्ला

Breaking News | Ahilyanagar: दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून आऊटसोर्समध्ये काम करणाऱ्या नाहेबराव झाडे या युवकावर शिर्डीतील वार तरुणांनी चाकू हल्ला करत त्याला गंभीर जखमी चार आरोपींविरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

Sai Sansthan employee attacked with knife

शिर्डी:  दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून आऊटसोर्समध्ये काम करणाऱ्या नाहेबराव झाडे या युवकावर शिर्डीतील वार तरुणांनी चाकू हल्ला करत त्याला गंभीर जखमी केले. ही घटना बुधवारी पात्री घडली. या प्रकरणात शिर्डी पोलिसांनी चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

साहेबराव झाडे याने शिर्डी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत हटले आहे, बुधवारी दुपारी २ ते ९ या वेळेत मी साईबाबा संस्थानमध्ये आऊटसोर्स कर्मचारी म्हणून संस्थांच्या बसवर मदतनीस म्हणून ड्युटी करीत होतो. रात्री ९ नंतर ड्युटी संपवून घरी जात असताना चौधरी वस्ती, श्रीराम नगर येथे माझ्या ओळखीचा अनिकेत संतोष पोटे याने मला रस्त्यात अडवून तू मला दारू पिण्यासाठी पैसे दे असे म्हणत पैशाची मागणी केली. मी त्याला माझ्याकडे पैसे नाही असे सांगितले. त्यावेळी अनिकेत पोटे याने माझे खिसे चापसायला सुरुवात केली. मी त्याला विरोध केला, म्हणून त्याने कमरेला असलेला चाकू काढून माझ्या हातावर मारून मला जखमी केले. त्याच्यासोबत असलेल्या मित्र योगेश गाडे याने त्याच्या हातात असलेला रॉड माझ्या पाठीत मारला. तसेच रोहित चाबुकस्वार व सतीश अनारसे यांनी मला लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. सतीश अनारसे याने माझ्या पॅन्टच्या खिशातील दोन हजार रुपये काढून घेतले. त्या दरम्यान मी आरडाओरडा केल्याने आजूबाजूचे लोक जमा झाले असता त्यांनी तिथून पळ काढला. पळून जाताना तू जर पोलीस स्टेशनला तक्रार केली तर तुला जिवंत सोडणार नाही, अशी त्यांनी मला धमकी दिली, अशी फिर्यात साहेबराव झाडे या युवकाने शिर्डी पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे यांनी चाकू हल्ला व मारहाण करणाऱ्या चार आरोपींविरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Breaking News: Sai Sansthan employee attacked with knife for not paying for liquor

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here