Home संगमनेर संगमनेर: साईपालखीच्या वाहनाला अपघात, एक ठार

संगमनेर: साईपालखीच्या वाहनाला अपघात, एक ठार

Breaking News  Sangamner Accident: साईपालखीच्या वाहनाला पाठीमागून येणार्‍या मालवाहतूक वाहनाने जोराची धडक दिली. या अपघातात एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला तर दोन महिला जखमी.

Sai Palkhi vehicle meets with accident, one killed

संगमनेर: पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील डोळासणे (ता.संगमनेर) शिवारात साईपालखीच्या वाहनाला पाठीमागून येणार्‍या मालवाहतूक वाहनाने जोराची धडक दिली. या अपघातात एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला तर दोन महिला जखमी झाल्याची घटना सोमवारी (दि.7) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली आहे.

याबाबत डोळासणे महामार्ग मदत केंद्राच्या पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की नारायणगाव येथील साईपालखी दरवर्षी घारगाव मार्गे शिर्डीला जाते. सोमवारी ही पालखी साईबाबांचे दर्शन करुन परतीचा प्रवास करत होती. दरम्यान, डोळासणे शिवारात महामार्गाच्या कडेला पालखी पाणी पिण्यासाठी थांबलेली होती. याचवेळी वाहन महामार्गाच्या कडेला उभे केले होते, त्यास पाठीमागून येणार्‍या मालवाहतूक वाहनाने जोराची धडक दिल्याने अपघात झाला. यामध्ये पालखीच्या वाहनातील सचिन पांडुरंग दरेकर (वय 45) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर दोन महिला जखमी झाल्या.

या अपघाताची माहिती समजताच आजूबाजूच्या नागरिकांसह डोळासणे पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब सांगळे, पोलीस कर्मचारी संजय मंडलिक, कैलास ठोंबरे, पंढरीनाथ पुजारी, श्री. आठरे यांच्यासह पथकाने धाव घेत मदतकार्य केले. तसेच घारगाव पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. यानंतर जखमींना तत्काळ उपचारार्थ हलविले, तर अपघातग्रस्त वाहने बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली.

Web Title: Sai Palkhi vehicle meets with accident, one killed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here