Home अकोले संगमनेरात कोयत्याचा धाक दाखवून साईभक्तांना लुटले

संगमनेरात कोयत्याचा धाक दाखवून साईभक्तांना लुटले

Sangamner Crime: शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी चारचाकी वाहनाने येत असलेल्या साईभक्तांना कोयत्याचा धाक दाखवून लुटले.

Sai devotees were robbed by showing fear of coyotes in Sangamner

तळेगाव दिघे:  अलिबाग (जि. रायगड) तालुक्यातील रेवदंडा येथून शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी चारचाकी वाहनाने येत असलेल्या साईभक्तांना कोयत्याचा धाक दाखवून लुटले. निळवंडे ते शिर्डी रस्त्यावर संगमनेर तालुक्यातील कौठेकमळेश्वर शिवारात शनिवारी पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, रेवदंडा (ता. अलिबाग) येथील प्रविण नाईक, अभय ठाकुर, गणेश मेसरी, राजेंद्र ठाकुर, अजय चौलकर, जयेश कोडे, ऋषिकेश पडवळ हे साईभक्त शनिवारी सकाळी ५.३० वाजेच्या सुमारास काकडी विमानतळ मार्गे असलेल्या कौठेकमळेश्वर रस्त्याने प्रवास करीत असताना चार अज्ञात लुटारूंनी इर्टीका गाडी आडवी लावून अडविले. कोयत्याचा धाक दाखवून लुटारूंनी साईभक्तांच्या चारचाकी वाहनाचे लायसन्स, बेंच, आधार कार्ड, पॅनकार्ड, मतदान कार्ड काढून घेतले. साईभक्तांची सोन्याची अंगठी व चैन तसेच रोख रक्कम मिळून ९३ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. दरम्यान साईभक्तानी आपला जीव वाचविण्यासाठी चारचाकी कौठेकमळेश्वरचे माजी सरपंच नवनाथ जोधळे यांच्या वस्तीकडे नेली. तरीही लुटारु वस्तीकडे जावून कोयत्याचा धाक दाखवून धमकावत होते. दरम्यान, नवनाथ जोधळे यांना आवाज आल्यानंतर ते बाहेर आले आणि त्यांनी साईभक्तांना वाचविले. नवनाथ जोधळे यांनी घटनेची माहिती संगमनेर तालुका पोलीस स्टेशनला दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी येत माहिती घेतली. याप्रकरणी प्रविण वसंत नाईक (वय ४९, रेवदंडा, ता. अलिबाग, जि. रायगड) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे. पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ए. के. मोकळ अधिक तपास करीत आहे.

Web Title: Sai devotees were robbed by showing fear of coyotes in Sangamner

See also: Latest Marathi News,  Breaking News liveSangamner NewsAhmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here