अकोले: खा. सदाशिव लोखंडे यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल
अकोले: खा. सदाशिव लोखंडे यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल
राजूर: अकोले तालुक्यातील मवेशीमधील कोंडारवाडी येथे विनापरवाना प्रचारसभा घेऊन आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या विरुद्ध राजूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत राजूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिर्डी मतदार संघातील सेना भाजप युतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांनी १४ एप्रिल रोजी सायंकाळी ४ ते ५ वाजेच्या सुमारास मवेशी येथील कोंडारवाडी येथील मराठी शाळेच्या आवारात विना परवाना प्रचार सभा घेतली. आदर्श आचारसंहिता लागू असल्याचे माहिती असताना त्यांनी प्रांतधिकारी यांची परवानगी न घेता विना परवाना जन समुदाय जमवून प्रचार सभा घेऊन आचारसंहितेचा भंग केला व जिल्हाधिकारी यांचे प्रतिबंधक आदेशाचे उल्लंघन केले म्हणून तालुका कृषी अधिकारी संजय पुंजीराम महाले रा. रुंभोडी ता. अकोले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजूर पोलीस ठाण्यात खा. लोकांडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस कैलास नेहे करीत आहे.
Website Title: Sadashiv Lokhande filed a complaint for violating code of conduct