Home सोलापूर खळं लुटणारा आणि मोठा चोर गावाकडं… सदाभाऊ खोत यांची शरद पवार आणि...

खळं लुटणारा आणि मोठा चोर गावाकडं… सदाभाऊ खोत यांची शरद पवार आणि राहुल गांधीवर नाव न घेता टीका

Sharad Pawar:  शरद पवार यांचं नाव न घेता टीका केली आहे. खळं लुटणारा गावाकडे आला. त्यामुळे तुम्ही त्याला बरोबर गावाकडं आणलं. इंडियातील मोठा चोर राहुल गांधी पण येणार.

Sadabhau Khot criticizes Sharad Pawar and Rahul Gandhi

मारकडवाडी: रयतक्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात शरद पवार यांच्या शारिरिक व्यंगावर टीका केली होती. या विधानाची जोरदार चर्चा झाली होती. त्यावेळी सदाभाऊ खोत यांना अजित पवारांनी देखील समज दिली होती. अशातच आता पुन्हा एकदा सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांचं नाव न घेता टीका केली आहे. खळं लुटणारा गावाकडे आला. त्यामुळे तुम्ही त्याला बरोबर गावाकडं आणलं. इंडियातील मोठा चोर राहुल गांधी पण येणार आहे, असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी शरद पवार आणि राहुल गांधीवर नाव न घेता टीका केली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकडवाडी गावात मागच्या काही दिवसांपासून राजकीय नेते भेट देत आहेत. या गावातील नागरिकांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त करत पुन्हा बॅलेट पेपरवर मॉक पोलिंग मतदान घेण्याचा निर्णय घेतला. मात्र पोलिसांनी जमावबंदी लागू केल्याने हे मॉक पोलिंग झालं नाही. त्यानंतर शरद पवार यांनी या गावात जात सभा घेतली. राहुल गांधी या गावातून ईव्हीएमविरोधात रॅली काढणार आहेत. तर भाजप आणि महायुतीकडूनही आज या गावात सभा घेण्यात येत आहे. या सभेत सदाभाऊ खोत बोलत होते. तेव्हा त्यांनी नाव न घेता शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.

पवारांवर टीका:

राजेश खन्ना सोबत राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांनी बॅलेट पेपरवर मतदान करतानाचा फोटो सभेत दाखवला. नवं तंत्रज्ञान राजीव गांधी यांनी आणले, टीव्ही, मोबाईल, EVM मशीन यांनी आणलं अमुक तमुक आम्ही आणलं. शरद पवारांनी आता शांत बसावं.पण यांना सत्ता गेल्यावर झोप लागत नाही. एखादा डाव पवारांनी टाकला तर पहेलवानाने नवा डाव टाकला असं म्हणतात. मात्र गेली 40 वर्षे यांनी डाव पहिले पण देवाभाऊ नावाचा वस्ताद मैदानात आला आहे. तेव्हा कळलं की हा पहेलवान नव्हता तर दुधी भोपळा होता. तुमची पोरगी 1 लाखाने निवडून आली. नातू रोहित पवार निवडून आले तेव्हा ईव्हीएम मशीन चांगली होती का? असं सदाभाऊ खोत म्हणालेत.

सदाभाऊ खोत यांनी केली राहुल गांधींची मिमक्री

राहुल गांधी यांचे एक स्वप्न आहे की माझं लग्न कधी होईल आणि लग्न झाल्यावर मी पंतप्रधान होणार आहे… राहुल गांधी गावात आल्यावर मारकडवाडीत दोन डबे मांडा, बॅलेट पेपरवर निवडून येऊ द्या. तो निवडून आला की त्याला पंतप्रधान करा, असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी राहुल गांधाी यांची मिमिक्री केली.

Web  Title: Sadabhau Khot criticizes Sharad Pawar and Rahul Gandhi

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here