Home महाराष्ट्र मराठ्यांना आरक्षण मिळू नये यासाठी सत्ताधारी व विरोधक एकत्र

मराठ्यांना आरक्षण मिळू नये यासाठी सत्ताधारी व विरोधक एकत्र

Maratha Reservation:  राजकारण्यांच्या नाकर्तेपणामुळे ही मराठ्यांवर वेळ आली आहे अशी सणसणीत टीका मनोज जरांगे पाटील यांनी विरोधकांसह सत्ताधाऱ्यांवर केली.

Ruling and opposition together to prevent Marathas from getting reservation

Manoj Jarange Patil: मराठा समाजाच्या वाटोळे करण्यास सर्व पक्षाचे नेते कारणीभूत आहेत. आता बघ्याची भूमिका घेऊ नका. उद्याच्या 29 ऑगस्टला मराठा आरक्षणाच्या लढायला एक वर्ष पूर्ण होत आहे. आज वर्षभर आपण ताकतीने लढलो. वर्षभर चाललेले हे आंदोलन देशातील एकमेव आंदोलन असेल. राजकारण्यांच्या नाकर्तेपणामुळे ही मराठ्यांवर वेळ आली आहे अशी सणसणीत टीका मनोज जरांगे पाटील यांनी विरोधकांसह सत्ताधाऱ्यांवर केली.

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांचा महाराष्ट्रात झंझावात सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज नगर शहरात मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने मराठा बांधव सहभागी झाले. रॅलीच्या अनुषंगाने शहरात ठिकठिकाणी मराठा बांधवांकडून येणाऱ्या बांधवांसाठी अल्पोपहाराची तसेच पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

यावेळी पुढे बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आम्ही ठीक ठिकाणी सभा घेत आहोत, मात्र सत्ताधाऱ्यांना मराठा समाज एकत्र येऊ द्यायचा नाही. राजकारण्यांना फक्त त्यांचा पक्ष मोठा करायचा आहे. मात्र आपला लढा हा आरक्षणाचा आहे. तुम्ही ज्या पक्षाचे नेत्याला मोठं केलं तो नेता आज मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलत आहे. प्रत्येक वेळेस आपण भावनेच्या आहारी जाऊन आपले नुकसान करत आहोत. आरक्षणासाठी मराठा समाज एकत्र आले पाहिजे असे म्हणत त्यांनी समाजाला एकत्र येण्याचे आवाहन केले.

दरम्यान उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, राजकीय नेत्यांच्या सभांना जायचं नाही आपण त्यांच्या बापाचे नोकर नाहीत. लोकसभेला आपण फक्त पाडा म्हटलो होतो. त्यांना वाटतं आमच्या सोबत कोणी नाही पण आमची ताकद आम्ही दाखवून दिली. विधानसभेला तर आम्ही थेट नाव घेऊनच पाडायला सांगणार. माझा मराठ्यांना त्रास दिला, गोरगरिबांना त्रास दिला, मराठा समाजाला त्रास देणाऱ्या नेत्याला यावेळेस सोडणार नाही. त्या नेत्याला मी विधानसभा निवडणुकीत पाडणार म्हणजे पाडणार अशी खमकी भूमिका यावेळी मनोज जरांगे यांनी घेतली.

पुढे बोलताना म्हणाले की, आमची अशी भूमिका नव्हती, आमची केवळ आरक्षणाची भूमिका, आमच्या समाजाला मोठे करणे हेच आमचे ध्येय होतं. मात्र आरक्षण न देण्यासाठी सत्ताधारी विरोधक एकत्र येत आहेत. मराठ्यांना आरक्षण मिळू नये यासाठी सत्ताधारी व विरोधक एकत्र आले. माझ्या विरोधात षडयंत्र सुरू आहेत असे देखील ते यावेळी म्हणाले.

Web Title: Ruling and opposition together to prevent Marathas from getting reservation

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here