संगमनेर: जिल्हा परिषद शाळेत पोषण आहाराची केली नासाडी, चोरी
Breaking News | Sangamner: शाळेत चोरट्यांनी शालेय पोषण आहाराची नासधूस करत शाळेत तेलाचा सडा मारला. मुलांच्या पोषणाची अंडी फस्त करत शेगड्या बाहेर फेकून दिल्या.
संगमनेर: जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत चोरट्यांनी शालेय पोषण आहाराची नासधूस करत शाळेत तेलाचा सडा मारला. मुलांच्या पोषणाची अंडी फस्त करत शेगड्या बाहेर फेकून दिल्या. संगणक शाळा फोडून त्यातील एलईडी टीव्हीचा संच, मॉनिटर आणि सीपीयुची हार्ड डिस्क चोरुन नेली. घारगाव पोलिसांना कळवूनही पोलिस निरीक्षक खेडकर यांनी बघ्याची भूमिका घेतल्याने घारगावचे गावकरी आता आक्रमक झाले आहेत.
शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घारगाव पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर ही चोरी झाली. चोरट्यांनी सुरुवातीला पोषण आहार शिजवण्याच्या खोलीचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. तेथील अंडी तळून खाल्ली. त्यानंतर पोषण आहाराचा तांदूळ, डाळ, अंडी व भाजीपाला अस्तव्यस्त करुन टाकला.
तेलाच्या सोळा पिशव्या फोडून भिंतीवर, वर्गात सर्वत्र, बाहेरच्या ओ- सरीत सडा शिंपला. अन्नधान्य आणि भाजीपाल्याची नासधूस केली. शेगड्या बाहेर फेकून दिल्या, मात्र सिलेंडरमधून होणारा गॅसचा प्रवाह तसाच सुरु ठेवला. त्यामुळे ‘त्या’ खोलीसह लगतच्या वर्गखोल्यांमध्ये सर्वत्र गॅस पसरला होता.
चोरट्यांनी संगणक प्रयोग शाळेतून एक ५२ इंचाचा एलईडी टीव्ही संच, शनिवारी सकाळी हा प्रकार शाळा उघडल्यानंतर निदर्शनास आला.
शिक्षकांनी सकाळी सातच्या सुमारास घारगाव पोलिसांना माहिती दिली. हकेच्या अंतरावर असलेल्या चोरी झालेल्या शाळेत जाण्यासाठी घारगाव पोलिसांच्या कर्मचाऱ्याला दोन तास लागले. घारगाव पोलिसांच्या या कृतीवर गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.
Web Title: Ruined and stolen food in Zilla Parishad school
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study