Home अकोले अकोलेत दरोडेखोरांचा धुमाकूळ, गुंगीचे औषध मारून लुटले

अकोलेत दरोडेखोरांचा धुमाकूळ, गुंगीचे औषध मारून लुटले

Breaking News | Akole: दरोडेखोरांनी चार घरांमध्ये घुसत घरातील झोपलेल्या व्यक्तींच्या तोडांवर गुंगीचे औषध असलेल्या कापसाच्या बोळा फिरवल्यामुळे गुंगी आल्याने घरातील व्यक्ती बेशुध्द अवस्थेत असताना चार घरांमधील पैसे, दागिने लुटले. (Robbers)

Robbers raid Akole, looted after killing a woman with a gun

अकोले:  अकोले तालुक्यातील वाघापूर येथे दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. रात्रीच्या वेळी दीड ते दोन वाजेच्या दरम्यान दरोडेखोरांनी चार घरांमध्ये घुसत घरातील झोपलेल्या व्यक्तींच्या तोडांवर गुंगीचे औषध असलेल्या कापसाच्या बोळा फिरवल्यामुळे गुंगी आल्याने घरातील व्यक्ती बेशुध्द अवस्थेत असताना चार घरांमधील पैसे, दागिने लुटले. एका आजीच्या गळ्यातील दागिना चोरण्यासाठी दरोडेखोरांनी कानच ओढल्याने कानच तुटल्याचे समोर आले आहे. यामुळे अकोले तालुक्यात एक नवी दरोडेखोरांची टोळी सक्रिय झाली की काय असा प्रश्न आता नागरिकांना पडला आहे.

हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. संदीप लांडे, जय औटी, यमुनाबाई औटी, भाऊसाहेब लांडे यांच्या घरांवर हा सशस्त्र दरोडा पडला. सकाळी नऊ वाजता तक्रार देण्यासाठी आलेल्या तक्रारदारांना तक्रारीसाठी पाच वाजल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे. अकोले तालुक्यातील वाघापूर येथे घडलेल्या प्रकारामुळे आता अकोले तालुक्यात भितीचे वातावरण पसरले आहे. वाघापूर येथे घडलेल्या घटनेतील आरोपी कधी जेरबंद होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यां विरुद्ध अकोले पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक मोहन बोरसे व त्यांचे सहकारी करत आहेत.

Breaking News: Robbers raid Akole, looted after killing a woman with a gun

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here